सरपंचांकडून वारकर्‍यांना ‘पुढारी’चे वाटप | पुढारी

सरपंचांकडून वारकर्‍यांना ‘पुढारी’चे वाटप

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा: पळसदेवच्या सरपंच इंद्रायणी मोरे यांच्या वतीने वारकर्‍यांना बिस्किटासह दैनिक ‘पुढारी’ अंकाचे वाटप करण्यात आले. पळसदेव गावात चौरंगीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यावर ग्रामस्थांच्या वतीने वारक-यांना वीज, पाण्यासह, रात्रीचे जेवण व झोपण्यासाठी निवार्‍याची सोय करून दिली होती.

त्याचबरोबर राज्यातील राजकारण, सत्तांतरात कोण बाजी मारणार आदींची माहिती त्यांना वेळेत मिळावी, यासाठी सरपंच इंद्रायणी सुजित मोरे यांच्यावतीने वारकर्‍यांना दैनिक पुढारीच्या अंकाचे वाटप केले. सर्जेराव जयराम मोरे यांच्या समरणार्थ सॅनिटायझर व मास्कचेही वाटप केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा, प्रीती रेड्डी, सुनील कणके, बाळासाहेब मत्रे, वसंत अडवाल, अमोल मोरे आदी उपस्थित होते.

Back to top button