भोसरीत विद्युतपुरवठा खंडित | पुढारी

भोसरीत विद्युतपुरवठा खंडित

भोसरी : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. दिवसभर पावसामुळे परिसरातील दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले होते. परिसरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दिवसभर परिसरात ढगाळ वातावरण असल्याने गारवा होता. परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाळमुळे बाजारपेठेत ही गर्दी दिसत नव्हती. परिसरातील लांडेवाडी, आदिनाथनगर, गव्हाणेवस्ती, भोसरी गावठाण, दिघी रोड, गवळीनगर, शास्त्री चौक, महादेवनगर, गुळवेवस्ती, धावडेवस्ती आदी भागात पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

वरुणराजाने दिलेल्या हजेरीमुळे मुख्य चौकात वाहतूककोंडी झाली होती. तसेच, पीसीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोरील सेवा रस्ता, चक्रपाणी वसाहत, सावित्रबाई फुले शाळा परिसरात कोंडीचा सामना करावा लागला.

Back to top button