63 सेवानिवृत्तांना पीपीओ प्रदान | पुढारी

63 सेवानिवृत्तांना पीपीओ प्रदान

पुणे : भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे (पुणे विभाग) सेवानिवृत्त 63 कर्मचार्‍यांना पेन्शन पेमेंट ऑर्डरचे (पीपीओ)वितरण गुरुवारी करण्यात आले. भविष्य निर्वाह निधी आयुक्त (वन) अमित वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली पीपीओचे वाटप झाले, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी धनंजय मोहिते यांनी दिली.

गुरुवारी पीएफ कार्यालय येथे 25 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या हातात भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) आदित्य तालवडे आणि भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) तुषार जाधव यांच्या हस्ते पीपीओ देण्यात आली.

Back to top button