पिंपरी : पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामे पाडली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: मौजे केसनंद गट नंबर 101 व 102 येथे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत वाणिज्य स्वरूपाची चार अनधिकृत बांधकामे तसेच पाच अनधिकृत चालू बांधकामे असे एकूण 9 सुमारे 10450 स्क्वेअर फुटांची बांधकामे निष्कासित करण्यात आली.

अनधिकृत बांधकामधारकांना महाराष्ट्र नगररचना कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती सदर निष्कासन कारवाई पाच पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाईच्या वेळी पीएमआरडीएचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परवानगी शिवाय कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये असे आवाहन बन्सी गवळी नियंत्रक तथा सहआयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग यांनी केले व सदर अनधिकृत बांधकाम धारकाकडून अनधिकृत बांधकाम निष्कासन खर्च वसूल केला जाईल असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version