पिंपरी : शहरात जोरदार पावसाची हजेरी | पुढारी

पिंपरी : शहरात जोरदार पावसाची हजेरी

पिंपरी : पिंपरी -चिंचवड शहरात गुरुवारी (दि.30) सायंकाळी आलेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला होता.
गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय संमिश्र वातावरण अनुभवत होते. दिवसभरात रिमझिम पाऊस पडत होता; मात्र मोठा पाऊस झाला नव्हता. गुरुवारी सायंकाळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे कामावर जाणारे नागरिक छत्री व रेनकोट घेवूनच बाहेर पडले होते. रात्री आठनंतर शहर परिसरात पावसाचा जोर वाढला होता. शहरातील सखल रस्त्यावर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून वाहने नेल्यामुळे अनेकांना वाहन नादुरुस्तीचा फटका बसला. तर काही चालक पाण्यातून हळू वाहने नेत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. पावसाच्या हजेरीने शहर परिसरातील वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.

Back to top button