प्रवाशाच्या दागिन्यांची चोरी | पुढारी

प्रवाशाच्या दागिन्यांची चोरी

पुणे : शहरात बसमध्ये सोन्याच्या बांगड्याची चोरी, चंदनाच्या झाडांची चोरी, तसेच मेट्रोच्या कामाचे साहित्य चोरून नेल्याच्या घटना समोर आल्या असून, याप्रकरणी विश्रामबाग, बंडगार्डन, खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत एक वृध्द महिलेला अप्पा बळवंत चौकात जायचे होते.

10 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी सिंहगड रोडवरून पीएमपीएल बस पकडली. त्यानंतर त्या सारसबाग येथील बसस्टॉपवर उतरल्या, त्यानंतर चिंचवडच्या बसमध्ये बसून अप्पा बळवंत चौकाकडे जात असताना या प्रवासादरम्यान त्यांच्या हातातील 50 हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली.

याप्रकरणी 71 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र सिंहजी रोड छावणी येथील रक्षा संपदा कार्यालयाच्या बंगला नंबर 16 जवळील चार चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत प्रेमराज वाघ (35, हडपसर) यांनी फिर्याद दिली. 28 जून रोजी सकाळी साडेदहाला हा प्रकार निदर्शनास आला.

Back to top button