पुणे : दुभाजकाला दुचाकी धडकून एक जण ठार | पुढारी

पुणे : दुभाजकाला दुचाकी धडकून एक जण ठार

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भरधाव दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. सागर शिवाजी विटकर (30 रा. रामलिंगनगर, येडशी, ता. जि. उस्मानाबाद) असे ठार झालेल्याचे नाव आहे. त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र राम महादेव देवकर (काळेवाडी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. येडशी, उस्मानाबाद) जखमी झाला आहे.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

हा अपघात पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ मदनवाडी-सकुंडे वस्ती येथे बुधवारी (दि.29) रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सागर व राम हे दोघे पुण्याहून सोलापूरच्या दिशेने मोटारसायकवरून (एमएच 24 केबी 8895) निघाले होते. सकुंडेवस्ती येथे त्यांची भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली. यामध्ये सागर ठार झाला. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हेही वाचा

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई : प्रेमप्रकरणातून तिघींचा पाडला मुडदा अन् स्वतः केली आत्महत्या, चार सुसाईड नोट सापडल्या

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

Back to top button