पुणे : तळेगाव ढमढेरे- न्हावरे रस्त्यावर अपघात | पुढारी

पुणे : तळेगाव ढमढेरे- न्हावरे रस्त्यावर अपघात

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे -तळेगाव ढमढेरे रस्त्यावर न्हावरे गाव परिसरात शेळकेवस्तीजवळ मंगळवारी (दि.28) एका मालवाहू ट्रकने एर्टिका गाडीला धडक दिल्याने सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठविले आहे. घटनेची नोंद न्हावरे पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

एर्टिका गाडीतून सर्व जण पुण्यावरून आपल्या गावाकडे येत असताना न्हावरेजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थ व न्हावरे पोलिस घटनास्थळी त्वरित हजर झाले. एर्टिकातील प्रवाशांना गाडीतून काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघातात एर्टिकाचा चालक दीपक संभाजी बांडे (वय -24, रा.वडगाव बांडे, ता. दौंड), निळकंठ चंद्रकांत खैरे (वय- 35), संदीप यशवंत खैरे (वय- 36), तुषार निळकंठ खैरे (वय- 23)रा. शिरसगाव काटा, चेतन सुरेश सोनवणे (वय- 23), रा. निर्वी, मिनीनाथ मच्छिंद्र गव्हाणे (वय- 25) व राहुल इथापे (वय- 27) रा. मांडवगण फराटा हे जखमी झाले.

Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा

ट्रकचालक अब्दूल फाईनखान लालखान पटेल (रा. बसवकल्याण, बीदर कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण हे शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Back to top button