पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी मार्गाची दुरवस्था | पुढारी

पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी मार्गाची दुरवस्था

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : लासुर्णे कळंब (ता. इंदापूर) या संत सोपानकाका महाराज पालखी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 3) लासुर्णे येथे मुक्कामी येणार आहे, तरी शासनाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी लासुर्णे येथे मुक्कामी आहे. मुक्कामानंतर पालखी सोहळा निंबाळकरमळा, कळंब, निमसाखर पुढे जातो. लासुर्णे-कळंब रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून रस्त्याची संथगतीने डागडुजी सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र, ठेकेदाराचे निष्कृष्ट काम व अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्याची पुन्हा मोठी दुरवस्था झाली आहे.

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

सध्या काही भागांतील डांबरीकरण जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण उखडून टाकले आहे. वाहनधारकांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सोमवारी (दि. 4 जुलै) संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा याच रस्त्यावरून जाणार आहे, तरी प्रशासनाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करावी, अशी मागणी लासुर्णे, निंबाळकर मळा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button