पुणे-पानशेत रस्त्यावर पुलांच्या कामांना वेग | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावर पुलांच्या कामांना वेग

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : हजारो पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर, डोणजे येथील अनेक महिन्यांपासून पुलांची अर्धवट झालेली कामे पुन्हा युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. पावसाळा सुरू होऊनही खानापूर येथील मोठ्या ओढ्यावरील पुलांची कामे अर्धवट असल्याने अतिवृष्टीत वाहतूक ठप्प होऊन सिंहगडाच्या पश्चिम भागासह पानशेत, वरसगाव, वेल्हे भागातील गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम वेगाने सुरू केले आहे. जेसीबी व इतर मशिनसह पन्नास मजुरांच्या साह्याने रात्रंदिवस काम सुरू आहे. पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांच्या देखरेखीखाली ठेकेदाराने पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे.

दोन्ही बाजूला भराव टाकून संरक्षक कठडे उभारले जात आहेत. पुलाच्या कामामुळे पर्यायी कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलासह राडा पसरला आहे. पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आह

Back to top button