वाकड : वाकड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत | पुढारी

वाकड : वाकड परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

वाकड : परिसरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाकड परिसरातमध्ये रस्त्यात मोकाट जनावरे, कुत्री सर्रास पाहायला मिळत आहेत. सकाळी कामावर जाणार्‍या जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर ही कुत्री अचानकपणे हल्ला करत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

परिसरातील कॉलनीमध्ये भटके कुत्रे रस्त्यावर बसून असतात. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्यापासून चावा होण्याचा धोका अधिक आहे. संध्याकाळच्या वेळेला बसस्टॉपवर उतरल्यानंतर घराकडे चालत जाताना कुत्री अंगावर येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रात्री चालत जाताना कुत्र्याचे घोळके उभी असतात. त्यामुळे जीव मुठीत धरून तिथून चालत जावे लागते.

वाकड परिसरात म्हातोबा झोपडपट्टी, काळाखडक, दत्त मंदिर रोड, माऊली चौक यमुनानगर तसेच परिसरातील बैठ्या कॉलनी सद्गुरू कॉलनी एक-दोन-तीन सुदर्शन कॉलनी एक ते सहा इत्यादी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे. कचरा कुंडीतील कचराच्या पिशव्या ही कुत्री रस्त्यावर आणूण टाकतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असल्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

Back to top button