पुण्यात वाढू शकतो कोरोनाचा संसर्ग; दक्षता घेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना | पुढारी

पुण्यात वाढू शकतो कोरोनाचा संसर्ग; दक्षता घेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

पुणे : पुण्यामधून दोन्ही पालखी सोहळे मार्गस्थ झाले आहेत. अगोदरच वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना केली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. शुक्रवारी (दि.24) पुणे शहरामध्ये 291, पिंपरी-चिंचवड भागात 121 आणि ग्रामीण भागात 84 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 741 एवढी आहे.

दरम्यान, राज्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने पाच हजारांचा आकडा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, त्याचवेळी राज्यातील क्रियाशील रुग्णांमध्ये वाढ झाली असून, दोन महिन्यांपूर्वीच्या केवळ 626 क्रियाशील रुग्णांवरून ही संख्या 25 हजारांपर्यंत पोहोचली आहे. सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

वाढत्या संख्येमुळे मास्क वापरावेत…
वाढती कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. राज्यात मास्कसक्ती नसली तरीही रुग्णसंख्येत होत असेलली वाढ लक्षात घेता आषाढी वारीमध्ये सहभागी होत असलेल्या वारकर्‍यांनी तसेच इतरांनीही मास्क वापरावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा

हमालीसाठी आता जादा पैसे रेल्वे स्थानकावरील ‘कुलीं’च्या सेवा दरात वाढ

पिंपरी : आई-वडिलांपासून विभक्त केल्याने पतीची आत्महत्या

खरीप मक्याची लागवड

Back to top button