देवा, साहेबांना बळ दे, बंडखोरांना सुबुद्धी दे; शिवसैनिकांनी केली रामाची महाआरती व होमहवन | पुढारी

देवा, साहेबांना बळ दे, बंडखोरांना सुबुद्धी दे; शिवसैनिकांनी केली रामाची महाआरती व होमहवन

येरवडा : पुढारी वृत्तसेवा: ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळो आणि बंडखोरांना सुबुद्धी प्राप्त होवो,’ असे साकडे घालत शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ‘हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व शिकवणीचे आम्ही सर्व शिवसैनिक, आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल, आज आणि उद्या ठामपणे आहोत.

शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातील जनतेला समर्पित आहे. ठाकरे हे शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील नेते आहेत,’ अशा भावना पुणे शिवसेना उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी व्यक्त केल्या. येरवड्यातील राम मंदिर, गणेश विसर्जन घाट, चिमा गार्डन येथे शिवसैनिकांच्या वतीने महाआरती व होमहवन झाले. या वेळी समन्वयक सुनील जाधव, संघटक सागर माळकर, विधानसभा उपप्रमुख सचिन भगत आदी उपस्थित होते.

हेही वाचा

बाळासाहेबांना सामान्य कुटुंबातील शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी हवा होता : दीपक केसरकर

पालिका निवडणुकीसाठी आता एकूण मतदार साडेचौतीस लाख

शिरूरचे मतदार टिंगरेनगरमध्ये; प्रारूप मतदारयादीत घोळ

Back to top button