सक्रिय रुग्ण दीड हजारांवर; दिवसभरात 360 कोरोना रुग्ण | पुढारी

सक्रिय रुग्ण दीड हजारांवर; दिवसभरात 360 कोरोना रुग्ण

पुणे: पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरात मागील तीन-चार महिने कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. सक्रिय रुग्णांची संख्या 50 पेक्षाही खाली आली होती. गुरुवारी (दि.23) शहरात नव्या 360 बाधितांची नोंद झाली. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 1664 वर पोहोचली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवत असून गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

यामधील अतिशय कमी रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एका रुग्णाला ‘नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलटर’वर ठेवण्यात आले आहे. तर दोघांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे सहव्याधीग्रस्त आहेत. ‘कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडी वाढ दिसून येत आहे. कोरोनाचे सौम्य स्वरूप आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागणार्‍या किंवा ऑक्सिजनची गरज भासणार्‍या रुग्णांची संख्या कमी राहील. मात्र, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे,’ असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले.

सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनीही प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे.

                              – डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, महापालिका

हेही वाचा

नेवासा : निबंधकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

औरंगाबाद : बंडखोर आसामात, कुटुंब मतदारसंघात; पोलिस बंदोबस्त

औरंगाबाद : पोलिस जावयाला बेदम मारहाण

Back to top button