सरासरी गाठायला उरले 7 दिवस

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात यंदा जून महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला आहे. 1 ते 22 जूनदरम्यान शहरात उणे 79.4 टक्के, तर जिल्ह्यात तब्बल 65 टक्क्यांनी तो कमी पडला आहे. आता जूनचे अवघे सात दिवस बाकी आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 जूनपासून पावसास प्रारंभ होत आहे. मात्र, जून महिन्याची पावसाची सरासरी सात दिवसांत गाठणे हवामान अभ्यासकांच्या मते अशक्य आहे.
जूनमहिन्यातील पावसाचा ताळेबंद
भाग पडलेला पाऊस जूनची सरासरी टक्के
पुणे 29.3 108 79.4 (घट)
जिल्हा 41.1 191.3 65 (घट)
मागील वर्षी पडलेला पाऊस
पुणे (शहर)
261.1 मिमी 57 टक्के जास्त
पुणे जिल्हा
132.7 मिमी 14 टक्के जास्त
जून महिन्यात अजूनही पावसाने शहरासह जिल्ह्यात पाहिजे तशी हजेरी लावली नाही, हे वास्तव आहे. पुणे शहर आणि संपूर्ण जिल्हा हा सह्याद्री पर्वतांच्या मागील बाजूस आहे. त्यामुळे या भागात पाऊस पोहोचण्यास उशीर होत आहे. हे एक कारण महत्त्वाचे कारण आहे.
– अनुपम कश्यपि,हवामान प्रमुख, पुणे वेधशाळा
हेही वाचा
नगर : पहिल्याच पावसात गुंडेगावचा बंधारा तुडूंब
औरंगाबाद : पोलिस जावयाला बेदम मारहाण
माझे कथन खोटे असेल तर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणत ; आ. कैलास पाटीलांनी शेअर केले फोटो