न्हावरे परिसरात पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला | पुढारी

न्हावरे परिसरात पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा: न्हावरे (ता.शिरूर) परिसरात बुधवारी (दि.22) रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने खरीप पेरण्यांना वेग येणार असून आधीच पेरलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाळा सुरू होऊनही या परिसरात अद्यापपर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. पाऊस नसल्याने शेतातील ढेकळे फुटलेली नव्हती.

त्यामुळे मूग व बाजरीचे पीक हातचे जाईल काय याची चिंता शेतक-यांना वाटत होती. विहिरींची पाणीपातळीही खूपच खोल गेली होती. वाड्या-वस्त्यांवर जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. दरम्यान बुधवारच्या पावसाने न्हावरे परिसराला झोडपून काढले. पावसाने ऊस, कडवळ आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. खरीप हंगामासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : रेंदाळ बँकेच्या व्यवस्थापक, कॅशिअरकडून अपहार

पालघरमध्ये मालमत्तांच्या करात होणार भरीव वाढ

भारतीय जीवनशैलीला अनुकूल कृत्रिम पाय विकसित

Back to top button