शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन झिरो ड्रॉपआउट; 5 ते 20 जुलैदरम्यान अंमलबजावणी | पुढारी

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन झिरो ड्रॉपआउट; 5 ते 20 जुलैदरम्यान अंमलबजावणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य झाल्याचे, शाळा सोडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राज्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून  मिशन झिरो ड्रॉपआउट राबवले जाणार आहे. या अंतर्गत 5 ते 20 जुलैदरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शिक्षण विभागासह महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभाग, गृह आणि आरोग्य विभागाचा या उपक्रमात सहभाग आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मार्च 2021 आणि त्या पूर्वीही सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यातून शाळाबाह्य असलेले सर्व विद्यार्थी शिक्षण प्रवाहात दाखल झाले नाहीत. तसेच कोरोना काळात विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे, शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता पुन्हा एकदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आ. दीपक केसरकर यांची बंडखोरी

मिशन झिरो ड्रॉपआउट योजनेअंतर्गत विविध स्तरांवर समित्या आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेतील जन्म-मृत्यू कागदपत्रांचा आधार घेऊन कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाईल. तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांतील मुलांची, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरित होणार्‍या मुलांची, अन्य वस्तीतून शाळा वस्तीत स्थलांतरित होणार्‍या मुलांची माहिती घेतली जाईल. तसेच वस्ती, वाडी, गाव, वॉर्ड या स्तरावर सर्वेक्षण करण्यात येईल. ग्रामस्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन गावातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल याची काळजी घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

ढोलताशांच्या गजरात मोहीम
शाळाबाह्य मूल आढळल्यास गावस्तरावरील समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागाने विशेष नोंदणी मोहीम राबवून त्या मुलाला त्याच्या वयानुरूप वर्गात दाखल करावे. ही मोहीम ढोलताशांच्या गजरात दिंडी रूपाने राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हेही वाचा

पावसाने दगा दिल्यास मुंबईत पाणीकपात अटळ

सातारा : विठुरायाची ओढ; पण पावसाअभावी हिरमोड

कॅण्टोन्मेंट बोर्डला 37 लाख रूपये अनुदान मंजूर

Back to top button