एमपीएससी करणार 800 पदांची भरती | पुढारी

एमपीएससी करणार 800 पदांची भरती

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची आठशे पदांच्या भरतीची जाहिरात गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांना या परीक्षेसाठी 25 जून ते 15 जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. दुय्यम निबंधक पदाची भरतीप्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार असून, या पदाची 1994 नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राज्यभरातील 37 केंद्रांवर 8 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. तर, पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. सहायक कक्ष अधिकारी गट ङ्गबफ या संवर्गातील 42, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील 79, पोलिस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील 603 आणि दुय्यम निबंधक संवर्गातील 78 पदांची भरती केली जाणार आहे.

2020 मध्ये 807, 2021मध्ये 1 हजार 85 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर, 2022 साठी आठशे पदांची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होऊ शकतो. तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाच शाळाच ‘आदर्श’

राष्ट्रीय पक्षाची महाशक्‍ती पाठीशी : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

सातारा : पावसामुळे धूळवाफ पेरणीला मिळाले जीवदान

Back to top button