सब खेलो सब जितोमध्ये बक्षिसांची लयलूट; दै पुढारीतर्फे आयोजित योजनेत वाचक, वृत्तपत्र विक्रेत्यांना बक्षीस वितरण | पुढारी

सब खेलो सब जितोमध्ये बक्षिसांची लयलूट; दै पुढारीतर्फे आयोजित योजनेत वाचक, वृत्तपत्र विक्रेत्यांना बक्षीस वितरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दैनिक  पुढारी आयोजित उत्सव सब खेलो सब जितो या भव्य वाचक आणि वृत्तपत्र विक्रेते योजनेचे बक्षीस वितरण
दै. पुढारीच्या कार्यालयात करण्यात आले. दैनिक पुढारीच्या वतीने वाचक आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी 7 ऑक्टोबर 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत बक्षीस योजना राबविली गेली होती. या योजनेची सोडत अनुक्रमे 28 एप्रिल आणि 24 मे रोजी झाली.

या सोडतीत विजेत्या झालेल्या वाचक आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना ज्यूपिटर दुचाकी, लॅपटॉप, डबल डोअर फ्रिज, सिंगल डोअर फ्रिज, वॉटर प्युरिफायर, मोबाईल, सायकल, पेडेस्टल फॅन इ. बक्षिसांचे विजेत्यांना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या उपस्थितीत बक्षिसे वितरीत करण्यात आली.

यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संजय भोसले, विश्वस्त संदीप शिंदे, दैनिक मपुढारीफचे सरव्यवस्थापक दिलीप उरकुडे, सहायक सरव्यस्थापक विजय शिरगावकर, नॅशनल हेड मार्केटिंग आनंद दत्त, मनुष्यबळ व्यवस्थापक आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. मिलिंद जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैभव जाधव यांनी आभार मानले.

लॉकडाऊननंतर प्रथमच गोष्टींचा गण्या कोल्हापुरात

पुढारीच्या योजनांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक पुढारीच्या वतीने नेहमीच वाचक आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. चांगल्या दर्जाची बक्षिसे दिली जातात. याची वाचकांना आणि विक्रेत्यांना खात्री असल्याने वाचक आणि विक्रेते मोठ्या संख्येने या योजनांमध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. यापुढेदेखील अशा योजना ङ्गपुढारीफच्या वतीने राबविल्या जाव्यात, त्यास पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ संपूर्ण सहकार्य करेल.

                                    – विजय पारगे, अध्यक्ष- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

हेही वाचा

कुरुंदवाड : अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात

कुरुंदवाड : अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात

गोवा : प्रसंगी टॅक्सींचे परवाने करणार निलंबित

Back to top button