पुणे : बेकायदेशीर हातभट्टी दारू विकणारा सराईत दोन वर्षासाठी तडीपार | पुढारी

पुणे : बेकायदेशीर हातभट्टी दारू विकणारा सराईत दोन वर्षासाठी तडीपार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चोरून हातभट्टीची दारू विक्रीचा धंदा करणार्‍या व आठ गुन्हे असलेल्या सराईताला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंड 5 च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत. प्रेमसिंग शांताराम राठोड (31, रा. गव्हाने वस्ती, गंगाधाम रोड, बिबवेवाडी) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ बाळगणे व विक्री करणे, बेकायदेशिर हातभट्टीची दारू विकणे अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल होते. परिसरातील सामान्य नागरिक त्यांच्या अवैध धंद्यांना कंटाळले होते.

तेथील मजुर वर्गत्यांना मिळणारी मजुरी ही नशेच्या व्यसनापायी घालवुन आपल्या कुटुंबाकडे दुर्लख करत होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ निरी विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत डिगे यांनी याबाबत तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्फत पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली.

Back to top button