निगडीतून पाण्याचे मीटर चोरीला | पुढारी

निगडीतून पाण्याचे मीटर चोरीला

पिंपरी : महापालिकेने बसवलेले दोन हजार रुपये किंमतीचे चार पाण्याचे मीटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी आठच्या सुमारास प्राधिकरण, निगडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी सोमनाथ दगडू स्वामी (62, रा. गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी सोमवारी (दि. 20) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रत्नागिरीतील आणखी एक आमदार नॉटरिचेबल

त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्यासह मंगेश स्वामी, रमेश ठोंबरे, नसरुद्दीन मोमीन यांच्या घराजवळ महापालिकेने बसवलेले पाण्याचे मीटर चोरून नेले. या मीटरची किंमत प्रत्येकी पाचशे रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.

Back to top button