वाकड परिसरातील रस्त्याचे काम कासवगतीने | पुढारी

वाकड परिसरातील रस्त्याचे काम कासवगतीने

वाकड : परिसरातील भिंगारे कॉर्नर भागात रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, मागील दोन महिन्यांपासून रस्ता उकरून ठेवण्यात आलेला आहे. रस्त्यावरती डांबरीकरणासाठी खडी टाकून जवळपास दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. स्थानिक नागरिकांना आपल्या गाड्या पार्क करण्यासाठी किंवा त्या रस्त्यावरून येण्या-जाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरती टाकलेल्या खडीवरून गाडी चालवताना गाडी घसरण्याची शक्यता असून या रस्त्यावरून चालताना सुद्धा नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा दोन-तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता तयार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम एक महिन्यासाठी तुरुंगातून सुटला

रस्ता करताना एका लाईटच्या डीपी शेजारी मोठा खड्डा खोदरण्यात आला असून, त्या खड्ड्यामध्ये पाणी साठलेले आहे. या पाण्यामध्ये विजेच्या वायर गेलेले असून पावसाळ्यामध्ये शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक संभवतो. तसेच, पावसामध्ये हा खड्डा पाण्याने भरला तर लहान मुलांसाठी मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने एखादी अनुचित घटना घडली आधी ताबडतोब हा खड्डा बुजवून रस्त्याची लेवल करावी, अशी मागणी केली जात आहे.

Back to top button