पुणे: निमगाव दुडे पुलावरील प्रवास धोकादायक | पुढारी

पुणे: निमगाव दुडे पुलावरील प्रवास धोकादायक

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – निमगाव दुडे या गावांना जोडणारा घोड नदीवरील पूल प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्याचे लोखंडी पाईप अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नवीन पुलाच्या आणि रस्त्याच्या कामाला भेट देत असतात. तरीही पुलावरील संरक्षक पाईपांकडे त्यांचे दुर्लक्ष का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

टाकळी हाजीपासून निमगाव दुडे, कवठे येमाई, मलठण, रावडेवाडी, मिडगुलवाडी, सविंदणे तसेच पराग कारखाना, मंचर, नारायणगाव, बेल्हा- जेजुरी महामार्ग, अष्टविनायक महामार्ग अशा अनेक रस्त्यांना व गावांना जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तसेच शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी याच पुलावरून शाळेत जात आहेत.

भोसरी चौकातील पांढरे पट्टे गायब

नवीन पुलाचे काम चालू आहे तेथे फलक लावण्यात आलेला नाही. पुलावरून जाताना वाहन चालकाचे दुर्लक्ष झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या ठेकेदाराने महिनाभरापूर्वी काम सुरू करूनही तेथे काम चालू असल्याबाबत फलक लावलेला नाही. तेथे फलक लावावा अशी मागणी होत आहे. तसेच वाहन चालकांनी पुलावरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

 

Back to top button