पुणे : कामगारांचे मोबाईल चोरणारा जेरबंद | पुढारी

पुणे : कामगारांचे मोबाईल चोरणारा जेरबंद

रांजणगाव गणपती : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत कामगारांचे मोबाईल चोरी करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे 40 मोबाईल संच जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत अनेक कामगार वास्तव्यास आहेत. अनेक कामगार हे शिफ्टनुसार काम करीत असतात. कामाच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्याने कामगार हे खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बर्‍याचदा झोपतात. हीच संधी साधून भामटे मोबाईलचोरीचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून अशा चोर्‍यांचे प्रमाण एमआयडीसीत वाढल्याने चोरीचा छडा लावणे गरजेचे होते.

Suicide : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या

त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस प्रयत्न करीत होते. दरम्यान, तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितास ताब्यात घेतले. या वेळी अधिक तपास केला असता आरोपीने परिसरात अशाच प्रकारे चोर्‍या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 40 मोबाईल जप्त केले आहेत. उर्वरित मोबाईलचे खचएख शोधून मालकाचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

ही कामगिरी पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस जवान उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार सुनील नरके, वैभव मोरे, रघुनाथ हलनोर यांनी केली.

Back to top button