बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक | पुढारी

बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक

 

उरुळी कांचन : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वैभव म्हस्कू कुंजीर (वय 24, रा. वळती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव म्हस्कू कुंजीर याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलवर नेऊन तिचा शारीरिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी वैभव म्हस्कू कुंजीर हा बाजारमळा उरुळी कांचन येथे अंधारात बसला आहे. त्या ठिकाणाहून पोलिसांनी आरोपी वैभवला अटक केली. त्यानंतर आरोपी वैभवने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Back to top button