कामशेतच्या बाजारात गावरान आंब्याला मागणी | पुढारी

कामशेतच्या बाजारात गावरान आंब्याला मागणी

कामशेत : येथील बाजारपेठेत गावराण आंबे दाखल झाले असून, त्याला ग्रामस्थांची चांगली मागणी असल्याचे दिसत आहे.
उन्हाळा आला की, आठवण होते ती आंब्याची. या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हा गावरान आंबा शेताच्या बांधावर, घराच्या मागील बाजूस किंवा डोंगर भागातील जंगलात जाऊन काढून आणून शहरी भागात विक्रीसाठी आणले जाते.

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई राहणार उपस्थित

50 ते 200 रुपये डझन या दराने आंबा मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व आदिवासी बांधवांना एक उपजिविके साधन मिळते; पण सध्या हा गावरान आंबा आज हद्दपार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आमराईमुळे गावातील घराघरांत आंबे असायचे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतमजुरांची घरेसुद्धा आंब्यांनी भरलेली असायची.

वेगवेगळ्या चवीच्या या रसभरित आंब्यामुळे ग्रामीण भागात चंगळ असायची. अलीकडे गावरान आंबा दुर्मिळ होत चालला आहे. आमराई नष्ट झाल्या आहेत. बाजारात गावरान आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे गावरान आंब्याची चवही दुर्मिळ झाली आहे. आज मार्केटिंगचा जमाना आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून बाजारात आंबा येतो. या आंब्याला कृत्रिमरीत्या पिकवून पिवळा केल्या जाते. मात्र, गावरान आंब्याची चव त्याला मुळीच नसते. गावरान आंबे का नष्ट झाले. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडांची संख्या थोड्या बहुत प्रमाणात आजही आहे.

Back to top button