सिंदखेडराजा ते पाचाड अभिवादन यात्रा उद्या पुणे जिल्ह्यात | पुढारी

सिंदखेडराजा ते पाचाड अभिवादन यात्रा उद्या पुणे जिल्ह्यात

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) ते समाधिस्थळ पाचाड (रायगड) या अभिवादन यात्रेचे पुणे जिल्ह्यात गुरुवारी (दि. 16) आगमन होणार आहे. शुक्रवारी (दि. 17) जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी पाचाड येथील समाधिस्थळी यात्रेचा समारोप होणार आहे, असे अभिवादन यात्रा समितीचे संयोजक व लखुजीराजे राजेजाधव यांचे वंशज शिवाजीराव राजेजाधव यांनी सांगितले.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवरायांच्या विश्ववंदनीय वारशाचा रथयात्रेतून जागर केला जाणार आहे. प्रथमच विदर्भ, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्र, कोकणपर्यंत ठिकठिकाणी जिजाऊंना मानवंदना दिली जाणार आहे. बुधवारी (दि. 15) सिंदखेडराजा येथून यात्रा मार्गस्थ होणार आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर, तुळापूर फाटा, लोणीकंद, पुणे, चांदणी चौक, भुगाव, भुकूम, पिरंगुट आदी ठिकाणी यात्रेचे स्थानिक शिवभक्त, ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशराव मोहिते, शिवभक्त राजेंद्र बांदल, अक्षय सातपुते, विनोद माझीरे आदींसह वीर मावळ्यांचे वारसदार आणि शिवभक्त सहभागी होणार आहेत. याबाबत शिवाजीराव राजेजाधव म्हणाले की, जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राच्या जननी राजमाता जिजाऊ यांच्या ऐतिहासिक स्मृतींचा जागर व्हावा, नवीन पिढीत राष्ट्रीय बाण्याची भावना वाढीस लागावी, यासाठी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button