पुणे : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला, घातपाताची चर्चा | पुढारी

पुणे : पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला, घातपाताची चर्चा

मंचर; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी शिवारातील विहीरीमध्ये १९ वर्षीय शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृतदेह सोमवारी (दि . १६ ) रोजी सायंकाळी आढळून आला आहे.

शुभांगी ही शेती पंप बंद करण्यासाठी विहिरीवर गेली असता तिच्यावर बिबट्याने झडप घातल्याने जीव वाचवण्यासाठी ती विहिरीत पडली असावी. किंवा शेती पंपाचा विजेचा शॉक बसून किंवा अन्य कारणांनी तिचा घातपात झालेला असावा असा संशय ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला . त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे.

मिळालेली माहिती अशी की, कळंब गावातील गणेशवाडी येथील शेतकरी संजय खंडू भालेराव यांची पत्नी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी सोमवारी सकाळी निरगुडसर येथे गेली होती.

सकाळी कुटुंबातील सर्वांचा स्वयंपाक करून मुलगी शुभांगी ही बबन कोंडाजी भालेराव यांच्या सार्वजनिक हिस्सा असलेल्या विहिरीतून शेती पंपाद्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता गेली.

त्यानंतर गणेश वाडी येथे वडील संजय भालेराव हे काही कामानिमित्त गेले. साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्याने ती पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी असणार्‍या मंचर येथील अकॅडमीसाठी गेली असावी.

या उद्देशाने ट्रेनिंग साठी जात असलेल्या गावातील स्वप्निल खंडागळे याला तिचा भाऊ शुभमने फोन करून शूभांगी अकॅडमी ला आली का? असे विचारले असता स्वप्नीलने सांगितले की ती आज आली नाही.

शेजारी वहिनीकडे गेली असावी हे समजून ती बराच वेळ वाट पाहूनही घरी आली नाही. म्हणून आजूबाजूला त्याने शोध घेतला. त्यानंतर स्वप्निल खंडागळे आणि तेथील शेजारी नातेवाईकआणि शुभांगी चा धाकटाभाऊ शुभम यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीला पाणी भरपूर असल्याने अंदाज येत नव्हता.

अखेर शेवटी गळ टाकून पाहिले असता गळाला काहीतरी जड लागते असे समजून त्यांनी गळ अधिकच खोलवर सोडला. त्याद्वारे शुभांगी ची कपडे गळाला लागली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुभांगीलाविहिरी बाहेर काढले असता ती मृत झाल्याचे दिसून आले.

परंतु तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लोचके तोडलेले दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बहुदा शेती पंप बंद करण्यासाठी विहिरी जवळ असताना अचानक पणे मागून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले. ती जीव वाचवण्यासाठी विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, किंवा विजेचा शॉक बसून ती विहिरीत पडली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विजेचा शॉक बसून तिचा मृत्यू झाल्याचा संशय

८ दिवसापूर्वी तेथे धनगर मेंढपाळ तील घोडा बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. तसेच या संदर्भात वन खात्यानेही पंचनामा केला आहे. त्यामुळे बहुदा शुभांगीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच काही स्थानिक ग्रामस्थांनी बहुधा घातपाताचा किंवा विजेचा शॉक बसून तिचा मृत्यू झाला असावा . असा संशय व्यक्त केला आहे.

घटनास्थळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी भेट दिली असून शुभांगी भालेराव हिचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी सहा वाजता पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल तोपर्यंत नेमकी घटना कशी झाली, नेमकी घटना कशामुळे झाली याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

नेमकी घटना कशामुळे झाली याचा अंदाज वर्तवणे कठीण

पोलिस निरीक्षक म्हणाले शुभांगी च्या मृतदेहाचे पाहणी केली असता नेमकी घटना कशामुळे झाली याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. सकाळी साडेनऊ वाजता शेती पंप बंद करण्यासाठी गेली आणि सायंकाळी पाच वाजता तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या कालावधीमध्ये विहिरीच्या पाण्यातील जलचर प्राण्यांनी तिचे पायाची बोट ,ओट कुरतडलेले दिसून आले.

कळंब गावचे रहिवासी आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव म्हणाले शुभांगी चा झालेला दुर्दैवी मृत्यू बहुधा बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा असा अंदाज असून शवविच्छेदनानंतर यावर बोलणे संयुक्तिक राहील. आठवड्यापूर्वी गणेश वाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात भरदिवसा घोडी ठार झाली. तीन बिबटे घोडी खात असतानाचे दृश्य शेतकऱ्यांनी पाहिल्याचे भालेराव यांनी सांगितले.

हे ही वाचलत का :

अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत

Back to top button