लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांमध्ये सर्रास ड्रोन वापरावर निर्बंध | पुढारी

लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांमध्ये सर्रास ड्रोन वापरावर निर्बंध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: लग्न समारंभ, क्रीडा स्पर्धा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांमध्ये ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर वाढला असून, फोटोग्राफर्स प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता ड्रोनचा वापर करतात. केंद्र सरकारने विनापरवानगी ड्रोन वापरावर बंदी आणली आहे. देशामध्ये ड्रोनच्या वापरावर कडक निर्बंध होते आणि आता परवानगीबाबत नियम लागू केले असून नियमांचे पालन न केल्यास 1 लाख दंड करण्यात येणार आहे.

शहरात खासगी कार्यक्रमात ड्रोन कॅमेरे वापरले जात आहेत. खासगी कार्यक्रमात ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते. मोर्चासाठी अथवा आंदोलनासाठी, तसेच इतर शासकीय कार्यक्रमासाठी ड्रोनबाबत शहरालगत देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाची परवानगी घेतली जाते. ड्रोनसाठी परवानगी घेताना पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असते. प्रत्यक्षात खासगी कार्यक्रमामध्ये ड्रोन वापरताना कोणतीही परवानगी घेतली जात नाही.

ड्रोनबाबत माहिती मिळावी यासाठी केन्द्र सरकारच्या वतीने वेगळी वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे. यावर ड्रोन उडवण्याच्या लायसन्सपासून मार्गापर्यंतची माहिती मिळणार आहे. ड्रोन कुठे उडवायचा, किती उंचीपर्यंत उडवायचा, तसेच नियम याबाबत सर्व माहिती वेबसाईट वर उपलब्ध आहे.

ड्रोन पाच प्रकारात विभागले गेले आहेत

250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे
2 ते 25 किलो वजनाचे ड्रोन
25 ते 150 किलो वजनाचे ड्रोन
150 किलोपेक्षा जास्त वजनाचे ड्रोन
यापेक्षाही मोठे ड्रोन

Back to top button