तर आता एकाच फेरीची संधी हुकेल; अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा | पुढारी

तर आता एकाच फेरीची संधी हुकेल; अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास आणि अचानक प्रवेश रद्द केल्यास, त्यांना पुढील तीन ऐवजी एका फेरीचीच संधी हुकणार आहे. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पुढील तीन फेरीपर्यत प्रवेशासाठी प्रतिबंध करण्यात येत होता.

त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई (महानगर क्षेत्र), अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सध्या या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सादलगाव येथे वादळी वार्‍याने शेतकर्‍याच्या घराचे पत्रे उडाले

या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पर्यायातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास, घेतलेला प्रवेश रद्द केल्यास आणि महाविद्यालयाने प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पुढील तीन प्रवेश फेर्‍यांमध्ये सहभागी होण्यास बंदी होती.

या विद्यार्थ्याला चौथ्या विशेष फेरीमध्ये सहभागी व्हावे लागत होते. मात्र, या नियमात बदल करण्यात आला असून, संबंधित विद्यार्थ्याला पुढील एका फेरीतच सहभागी होता येणार नाही. त्यामुळे पुढील फेर्‍यांमध्ये त्याला सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

हेही वाचा 

मनपा शाळांत सलग दुसर्‍या वर्षी शालेय साहित्य नाही ; फक्त पाठ्यपुस्तके देऊन करणार स्वागत

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांना महाराष्ट्र काँग्रेसचा पाठींबा : नाना पटोले

सावेडीतून 41 तोळे लंपास, भिस्तबाग परिसरात जबरी घरफोडी

Back to top button