पिंपरी : चारित्र्य पडताळणीअभावी नोकरीवर गदा | पुढारी

पिंपरी : चारित्र्य पडताळणीअभावी नोकरीवर गदा

शशांक तांबे: 

पिंपरी : शहरातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांची वानवा असताना चारित्र्य पडताळणी वेळेत होत नसल्याने पोट भरायला आलेल्या अनेक कामगारांच्या नोकरीच्या संधी निघून जात आहेत. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या अनेक नागरिकांना शहरात येऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उद्योगनगरी असणार्‍या पिंपरी चिंचवड शहरात अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्यापासून ते सुरक्षा रक्षक एजन्सी, ट्रान्सपोर्ट अशा अनेक कंपन्यांना चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक असते. नोकरीसाठी आलेल्या नागरिकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राचे काम होत नसल्याने अनेकांच्या नोकरीच्या संधी निघून जात आहे.

हैदराबाद : टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषाचा मृत्यू संशयास्पद

कोरोना टाळेबंदी नंतर मोठ्या प्रमाणात कर्मचारी आपापल्या गावी निघून गेल्याने शहरात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याने अनेकांनी उद्योग नगरीकडे धाव घेतली. परंतु कंपनीकडून चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी केल्याने नागरिकांची निराशा होत आहे.पोलिस आयुक्तालयातील चारित्र्य प्रमाणपत्र विभागात अधिकारी उपलब्ध नाही, काम संथ गतीने होत आहे, अशी उत्तरे नागरिकांना मिळत असून चारित्र्य प्रमाणपत्राचे काम होत नाही.

कर्मचार्‍यांची गरज
ऑटोमोबाईल क्षेत्र
सुरक्षा रक्षक एजन्सी
हाऊस किपींग कंपनी
वाहन क्षेत्रात चालक म्हणून

प्रमाणपत्राची गरज काय ?

मोठ्या कंपन्यांमध्ये अनेकदा जबाबदारीची कामे दिली जातात. वाहन क्षेत्रात कंटेनरमधून गाडी उतरवण्याचे व गाडी कंटेनरमध्ये ठेवण्याचे काम दिले जाते. यासाठी मोबदला देखील भरपूर दिला जातो. त्यामुळे चारित्र्य प्रमाणपत्राची गरज असते. सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र महत्वाचे असते. शहरात अनेक ठिकाणी बाहेर गावाहून अनेक नागरिक कामाच्या शोधात आले आहेत.

 

 

 

Back to top button