पुणे : माहेरहून पैसे न आणल्याने पत्नीला पाजले फिनेल | पुढारी

पुणे : माहेरहून पैसे न आणल्याने पत्नीला पाजले फिनेल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पैशांसाठी माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. पैशांसाठी विवाहितेचा छळ होण्याच्या आणि त्यांना मारहाण करून खून करण्यापर्यंतच्या घटना समोर येतात. मात्रएका महाभागाने आपल्या पत्नीला माहेरहून पैसे न आणल्याने चक्क फिनेल पाजल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, २४ तासांत ७,५८४ नवे रुग्ण, २४ मृत्यू

नवीन हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 20 लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून जीवन काळभोर याने आपल्या पत्नीला बळजबरीने फिनेल पाजत खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिचा पती जीवन नारायण काळभोर, दीर योगेश नारायण काळभोर व सासू सुनंदा नारायण काळभोर यांच्या विरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

नवाब मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

राज्यसभा निवडणूक : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या : संजय राऊत

Monsoon Update : अखेर मान्सून तळकोकणात दाखल, पुढील ४८ तासांत महाराष्ट्र व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती

Back to top button