पुणे : महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक | पुढारी

पुणे : महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बोलणे बंद केल्याच्या रागातून तरुणाने महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना कोंढव्यात घडली. तिच्याकडील मोबाईलही त्याने हिसकावून नेला.

महाविकास आघाडीला धक्का! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

याप्रकरणी सुहास राधाकृष्ण नवले (वय 36, रा. गंगाधाम) याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविण्याची व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उंड्री परिसरात घडली.  35 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व सुहास नवले एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून महिलेने सुहाससोबत बोलणे बंद केले होते. कारण सुहास याचे इतर मुलींसोबतदेखील संबंध असल्याची माहिती तिला मिळाली होती. त्यामुळे तिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. त्याचा राग आल्याने मंगळवारी सकाळी सुहासने महिलेला रस्त्यात गाठले. तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करीत आहेत.

Back to top button