पुणे : किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयातून तरुणाचा खून | पुढारी

पुणे : किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयातून तरुणाचा खून

मंचर (पुणे) ; पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव जि.पुणे) येथील किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाचा  खून झाल्‍याची घटना शनिवार (दि.१४ ) रात्री घडली. विकी गणपत भोसले (वय २४, रा. मंचर) असे त्‍याचे नाव आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी रविवारी चार संशयितांना ताब्यात घेतले.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी( दि.१४) रात्री मंचर गावच्या हद्दीतील मुळेवाडी रोडवर पिंटु उर्फ दौलत थोरात यांचे मुळेवाडी रोड येथील ऑफीसमध्ये गणेश पांडुरंग बोऱ्हाडे, संतोष सुखदेव जाधव, सार्थक संजय वळसे, पिंटु उर्फ रविंद्र दौलत थोरात (सर्व रा.मुळेवाडी मंचर) यांनी गणेश बोऱ्हाडे यांच्या किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून विकी गणपत भोसले (रा. मंचर)यास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच लाकडी काठी, क्रिकेटची बॅट व कमरेच्या पटयाने विकी याला जबर मारहाण केली.

मंचर पोलिसस्थानकात गुन्हा दाखल

मारहाण केलेल्या घटनेची माहिती जखमी अवस्थेत विकी याने त्याचा भाऊ योगेश भोसले यास सांगितली.

विकी याला कुटुंबीयांनी त्याला उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी विकी याचा भाऊ योगेश भोसले (रा.मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात रविवार (दि.१५) संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिली.तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर शेटे करत आहे. घटनास्थळी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांनी भेट दिली आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button