पुणे : मित्रासोबत निघालेल्या युवकास कोयत्याच्या धाकाने लुटले | पुढारी

पुणे : मित्रासोबत निघालेल्या युवकास कोयत्याच्या धाकाने लुटले

चाकण : पुढारी वृत्तसेवा

कुरुळी (ता. खेड) येथे इंद्रायणी नदीच्या पुलावरून मित्रासोबत पायी चालत जाणार्‍या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटले. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्यरात्री एक वाजता घडली.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

देवानंद डोमाजी घोडे (वय 21, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 31 मे) महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय बलभीम जाधव (वय 25, रा. चिखली) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

काश्मिरी पंडितांकडून आजही स्थलांतराचा विचार होतोय : संजय राऊत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा अमित्र राजेश दि. 23 मे रोजी मध्यरात्री एक वाजता पायी चालत कुरुळी येथे इंद्रायणी नदीच्या खालच्या पुलावरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून मोबाईल फोन आणि 1 हजार 900 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

Back to top button