पुणे : पादचारी रस्त्यावर; पथारीवाले पदपथावर | पुढारी

पुणे : पादचारी रस्त्यावर; पथारीवाले पदपथावर

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा

खराडी – चंदननगरमधील अनेक पदपथांचा ताबा पथारीवाल्यांनी घेतला आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून पादचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ बांधले आहेत. पण या पदपथांचा ताबा पथारीवाल्यांनी घेतल्याने पादचारी जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालतात. या पथारीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महाड : पतीच्या त्रासाला कंटाळून तिने घेतला ६ मुलांचा जीव; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

पालिकेने खराडी-चंदननगरमध्ये लाखो रुपये खर्च करून पदपथ तयार केले आहेत. पण या पदपथावर पथारीवाल्यांनी ताबा मारला आहे. यामुळे पदपथ नक्की कोणासाठी हा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिक रस्त्यावर व हातगाड्या पदपथावर असे चित्र पाहायला मिळत आहे. खराडी बायपास येथे पदपथावर अनेक पथारीवाले बसतात. तसेच खराडीतील झेन्सार कंपनीसमोर पदपथ पथारीवाल्यांनी व्यापून टाकला आहे.

काश्मिरी पंडितांकडून आजही स्थलांतराचा विचार होतोय : संजय राऊत

खराडी रिलायन्स मार्टसमोर पदपथावर भेळ, चायनीज, मोमोज, आइस्क्रीमवाले बसतात. या व्यापार्‍यांनी पदपथावर ताबा मारला आहे. पदपथावर ताबा मारणार्‍यांकडे अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पथारीवाल्यांची संख्या वाढली आहे. कारवाई केली जात नाही. एका टपरीमधून दरमहा साधारण 15 ते 20 हजार रुपये मिळत आहेत. यामुळे टपरी माफियांची संख्या वाढत आहे.

COVID19 | देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत ३,७१२ नवे रुग्ण

खराडी, चंदननगर भागामध्ये नियमित कारवाई केली जाते. पण पुन्हा पदपथावर अतिक्रमण केले जाते. लवकरच या भागामध्ये तीव्र कारवाई करण्यात येईल.

                                   – सुभाष तळेकर, अधिकारी, अतिक्रमण विभाग

Back to top button