आरक्षण सोडतीनंतर राष्ट्रवादी जोरात; अनेक ठिकाणी ठरणार फायदेशीर | पुढारी

आरक्षण सोडतीनंतर राष्ट्रवादी जोरात; अनेक ठिकाणी ठरणार फायदेशीर

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अनेक प्रभागांत फायदेशीर ठरली. महापालिकेत सत्ता मिळविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उमेदवारांची निवड करण्याच्या हालचाली त्यांनी गतिमान केल्या आहेत. राष्ट्रवादीने आघाडीसाठी मित्रपक्षांना दरवाजे उघडे ठेवतानाच स्वबळावरही निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे.

स्थानिक नेते त्या त्या भागातील राजकीय स्थितीचा अंदाज घेत उमेदवारांची नावे ठरविण्यास प्रारंभ केला आहे. अन्य पक्षांतील ताकदवान कार्यकर्त्यांनाही पक्षात घेण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सत्ता मिळविण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.

आरक्षणाने आघाडीत बिघाडी; पंधरा प्रभागांत होणार रस्सीखेच

राज्यातील पालिका निवडणुकांमध्ये या दोन महापालिकांमध्येच राष्ट्रवादीला संधी आहे. दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता होती. त्यामुळे तुल्यबळ लढाईची तयारी राष्ट्रवादी करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत संघटन वाढविण्याला पूरक भूमिका घेत असल्याचे जाणवते.

ईद मिलन, ब्राह्मण संघटनांचा मेळावा, डॉ. आंबेडकर यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेले हडपसर (14), वडगाव शेरी (9) आणि खडकवासला (8) असे 58 पैकी 31 प्रभाग या तीन विधानसभा मतदारसंघांतच आहेत.

बारावीचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात :वर्षा गायकवाड

गेल्या निवडणुकीत भाजपची लाट या मतदारसंघातच थोपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. समाविष्ट गावांमुळे या मतदारसंघातील प्रभाग वाढताना मध्यवर्ती पुण्यातील प्रभागांची संख्या घटली. तीनपैकी दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने 2019 मध्ये जिंकले, तर तिसर्‍यात निसटता पराभव झाला. त्याचा थेट फायदा घेण्याची रणनीती राष्ट्रवादीकडून आखली जात आहे.

तिन्ही मतदारसंघांत एकूण 93 नगरसेवक असून, त्यातील 49 मतदारसंघांत महिलांसाठी आरक्षण आहे. नगरसेविकांच्या निवडणुका पक्षाच्या आधारावर होत असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. हडपसरमध्ये माजी नगरसेवकांची संख्या मोठी असल्याने तेथे सर्वत्र उमेदवार आहेत. खडकवासला मतदारसंघांत त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. वडगाव शेरीत राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याची चिन्हे आहेत. पर्वती, कोथरूड मतदारसंघातही काही प्रभागांत अनुकूल आरक्षण पडले आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

हेही वाचा

पुणे : ओतूर येथे नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, एक ठार

1400 पुणेकर ‘गंडले’; सायबर ठगांकडून ऑनलाईन गंडा

नागपूर : बँकेला पावणेदोन कोटींचा गंडा घालणार आरोपी निघाला राष्ट्रवादीचा पदाधिकारी

Back to top button