पिंपरी : मतदारांचा डेटापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत जमावाजमाव झाली सुरू | पुढारी

पिंपरी : मतदारांचा डेटापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत जमावाजमाव झाली सुरू

शशांक तांबे

पिंपरी : महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ येत असल्याने मतदारांच्या डेटाचा योग्य वापर व्हावा यासाठी विविध सॉफ्टवेअर तयार करणार्‍या कंपन्यांना मागणी आली आहे. डेटापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत जमावाजमाव सुरू झाली आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी खात्री बाळगून अनेक जणांनी आपले काम सुरू केले आहे.

त्यामुळे डेटा जमवा-जमाव करण्यापासून ते सॉफ्टवेअर, वेबसाईट तयार करण्यासाठी कंपन्यांना कामे देण्यात आली आहेत. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक गोष्टी करता येतात. मतदारांचा डेटा फिड करून त्यांना एका क्लिकवर मेसेज पाठवता येतात. तयार केलेली गाणी पाठवता येतात. माहिती पट पाठवता येतो. त्यामुळे सॉफ्टवेअर तयार करणार्‍या कंपन्यांचे मार्केटिंग देखील जोरात सुरू आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी टेक्नॉलॉजीचा आधार

सध्या राजकारणात भोंग्याचा मुद्दा जोरात सुरू असल्याने भोंग्याच्या रिक्षा फिरवता येणार की नाही याबाबत अनेक उमेदवारांमध्ये गोंधळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी टेक्नॉलॉजीचा आधार उमेदवार घेत आहेत. सध्याच्या सॉफ्टवेअरची विक्री, मेसेज, डेटा फिल्टर, डेटा कंपायलेशन

मुंबईत भाजपचा मोर्चा, ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक, दरेकरांसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

अनेक कंपन्या निवडणूक सल्लागारांसोबत आपले सॉफ्टवेअर विकत आहेत. त्यामुळे कमी वेळेत जास्त उमेदवरांपर्यंत कंपन्या पोहोचत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अनेक उमेदवार पूर्व तयारी म्हणून डेटा संकलित करून ठेवतात. अनेक जण तशी कामे देतात किंवा सॉफ्टवेअर विकत घेतात.

                                                                               – सॉफ्टवेअर निर्माता

हेही वाचा

Back to top button