पुणे : रात्रीच्यावेळी मार्केटयार्ड परिसरात लुटमार करणारे जेरंबद | पुढारी

पुणे : रात्रीच्यावेळी मार्केटयार्ड परिसरात लुटमार करणारे जेरंबद

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्यावेळी मार्केटयार्ड परिसरात वाहनाला दुचाकी आडवी लावून नागरिकांना लुटणार्‍या दोघांना मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली; तर त्यांच्या अन्य एक साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. बबलु उर्फ कपील अतुल शिंदे (वय.19), अविनाश राम निंबाळकर (वय.23,राहणार दोघे प्रेमनगर मार्केटयार्ड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आशिष राठोड (वय. 26, रा. कारोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझम खान 27 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर, तीन दिवसात मुख्यमंत्री योगींना भिडणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वखार चौक मार्केटयार्ड येथे माल खरेदी करण्यासाठी पुसद येथून आले होते. त्यावेळी आरोपी बबलु, अविनाश व त्याच्या साथीदाराने राठोड यांच्या टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबले. त्यानंतर धमकावत राठोड व त्यांच्या साथीदाराला धमकावून खिशातील मोबाईल व मालकाने दिलेले दहा हजार रुपये काढून घेतले.

औरंगाबाद : सिल्लोड येथे माय- लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान हा प्रकार सुरू असताना आरडा-ओरडा सुरू होता. त्यावेळी तेथून बंडगार्ड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहूल पवार हे कर्तव्यावर निघाले होते. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यानी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने बबलु याला पकडले. त्यानंतर याची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना देण्यात आली होती. त्यांनी बबलु याच्याकडे चौकशी करून त्याचा साथीदार अविनाश याला अटक केली. दोघांवर यापूर्वीचा एक-एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम.ए.कांबळे करीत आहेत.

हेही वाचा

जळगाव : बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड ; एकास अटक

Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे वर्ग : सुप्रीम कोर्ट

कर्नाटकातील लोहखनिज निर्यातीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Back to top button