पुण्यात आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मोक्का | पुढारी

पुण्यात आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोथरुड व भुगाव परिसरामध्ये अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.

आझम खान 27 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर, तीन दिवसात मुख्यमंत्री योगींना भिडणार

अविनाश राजेंद्र कांबळे (टोळीप्रमुख) व त्याच्या टोळीतील सदस्य रवी ज्ञानेश्वर बोत्रे, किरण ज्ञानेश्वर बोत्रे (दोघेही रा. श्रावणाधारा वसाहत, कोथरुड), सुरज ऊर्फ सोन्या राम कुडले (रा. शेडगे आळी, भुगाव) अशी कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. संबंधित आरोपींवर कोथरुड पोलिस ठाण्यात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

औरंगाबाद : सिल्लोड येथे माय- लेकीची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कांबळे याने त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कोथरुड, भुगाव येथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघटीतपणे खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, घरफोडी, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण या स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्याकडून वारंवार गुन्हे घडत आहेत.

जळगाव : बनावट नोटांच्या कारखान्यावर धाड ; एकास अटक

या पार्श्वभुमीवर संबंधीत, आरोपींविरुद्ध मोका’नुसार कारवाई करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलिस उपायुक्तांमार्फत अतिरीक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविला. त्यानुसार, त्यांनी संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे 2022 पर्यंत 16, तर मागील वर्षभरात 79 मोक्काअंतर्गत कारवाया झाल्या आहेत.

Back to top button