श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार | पुढारी

श्रीराम पचिंद्रे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष ग्रंथ पुरस्कार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. संपादनाच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल लेखक, कवी श्रीराम ग. पचिंद्रे यांना ‘आशा प्रभाकर संत विशेष ग्रंथकार पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

ही माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोख रक्‍कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 26 मे रोजी सकाळी 10 वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे.

Back to top button