गडचिरोलीवरून पुण्यात गांजा आणणाऱ्या चौघांना अटक | पुढारी

गडचिरोलीवरून पुण्यात गांजा आणणाऱ्या चौघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोलीवरून पुण्यात गांजा घेऊन आलेल्या चौघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांसह दोन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून अडीच लाख रुपयांचा साडेबारा किलो गांजा जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रशिक पुरुषोत्तम झाडे, विकास रेवाचंद बनसोड, वेदांती देवीदास निकोरे आणि श्यामकला सुखदेव किरंगे (सर्व रा. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थविरोधी पथक सिंहगड रस्त्यावर गस्त घालत होते.

 

Back to top button