सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेचा वेग मंदावला - पुढारी

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेचा वेग मंदावला

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : शनिवार, रविवारचा विकेंड आणि त्याला जोडूनच सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांची आणि त्या अनुषंगाने वाहनांची संख्या वाढल्याने मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहनांचा इ आज (शनिवार)  वेग मंदावला आहे. परिणामी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

बोर घाटात सुरू असलेली रस्ता दुरुस्तीच्या कामांमुळे शनिवारी (दि.14) सकाळ पासूनच खालापूर टोल नाक आणि बोर घाटात मोठी कोंडी पाहायला मिळत होती. बोरघाटात अमृतांजन पुलापासून दोन्ही बाजुला वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रागां लागल्या होत्या. तर दुसरीकडे खालापूर टोल नाक्यावर लोणावळ्याच्या दिशेने आणि मुबंई दिशेने 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे ने प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button