पिंपरी : एसटीपी कार्यान्वित नसलेल्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीची ड्रेनेज लाइन बंद करणार | पुढारी

पिंपरी : एसटीपी कार्यान्वित नसलेल्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीची ड्रेनेज लाइन बंद करणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना मैला शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी/ ईटीपी) कार्यान्वित करणे बंधनकारक आहे.

मात्र, अनेक सोसायट्या तसे न करता थेट महापालिकेच्या ड्रेनेज लाइनमध्ये सांडपाणी सोडतात. पाण्याचा पुनर्वापर न करता पिण्याच्या पाण्याचा वापर वाढून शहरात मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

अशा सोसायटीची ड्रेनेज लाइन एका महिन्यानंतर बंद करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

तर ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो, नितेश राणेंचा गंभीर इशारा

शहरात पाच हजारांपेक्षा अधिक लहान व मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. दररोज 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणार्‍या मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना ओल्या कचर्‍यापासून कंपोस्टींग प्रकल्प आणि एसटीपी प्रकल्प कार्यान्वित करणे बंधनकारक आहे.

मात्र, अनेक सोसायट्या त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्या प्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाने अनेक सोसायट्यांना दंडही केला आहे. मात्र, त्यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. वारंवार सांगूनही काही सोसायट्या प्रतिसाद देत नसल्याची तक्रार सर्व आठ क्षेत्रीय अधिकार्‍यांनी आयुक्तांकडे केली आहे.

त्यानुसार आयुक्तांनी हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत एसटीपी प्रकल्पाची वार्षिक देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी खासगी एजन्सींच्या नावाची यादी देण्यात आली.

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर पुन्हा दिसणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा, नवा चित्रपट प्रदर्शनास सज्ज

तसेच, एसटीपीसाठी लागणार्‍या वीजपुरवठ्यात महावितरणकडून सवलत दिली जात असल्याचे 20 मार्च 2020 च्या पत्राची माहिती देण्यात आली.

तरी देखील अनेक सोसायटींनी मैलाशुद्धीकरण प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित केलेले नाहीत. बागकाम, रस्ते साफसफाई, फ्लशिंग, गाड्या धुणे आणि इतर ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे.

महिन्याभरात एसटीपी कायमस्वरूपी कार्यान्वित न केल्यास पालिकेची ड्रेनेज लाइन बंद करण्याची कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी संबधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचा बछडा आणला घरी

एसटीपी तपासणी व कारवाईसाठी उपअभियंता नरेश जाधव, विजय सोनवणे, अभय कुलकर्णी, दीपक कर्पे यांची समन्वय पथकात नियुक्ती केली आहे.

मेअखेरपर्यंत तपासणी करून नोटीसा देणार

शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायटीचे एसटीपी किंवा ईटीपीची तपासणी करा. एसटीपी बंद असलेल्या सोसायट्यांना देखभाल व दुरूस्ती करणार्‍या खासगी एजन्सीची माहिती द्या.

एसटीपीला महावितरणकडून असलेल्या सवलतीची माहिती द्या. ड्रेनेजलाइनचे जोड बंद करण्याची नोटीस देऊन कारवाई करा. एसटीपीद्वारे प्रकिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत प्रोत्साहन द्या. ही कारवाई मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

Back to top button