लोणावळा : लोणावळ्याच्या वीज वितरण कार्यालयात चोरी | पुढारी

लोणावळा : लोणावळ्याच्या वीज वितरण कार्यालयात चोरी

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : शनिवार व रविवार कार्यालय बंद असल्याची वेळ साधत चोरट्यांनी लोणावळा शहरातील वीज वितरणच्या (एमएसईबी) नांगरगाव येथील कार्यालयातील रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला आहे.सोमवारी सकाळी कार्यालयात कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

राहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडिओ व्हायरल

कार्यालयाचे मुख्य शटर गेटचे लॉक तोडत कार्यालयात घुसलेल्या चोरट्यांनी तिजोरी फोडत आतमधील 21 हजार रुपये रोख व दोन चेक चोरले. तसेच, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊ नये याकरिता कॅमेर्‍यावर काळा रंगाचा स्प्रे मारला.

मुख्यमंत्री -गृहमंत्री यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक

आतमधील सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून नेला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर लोणावळा शहरच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत पंचनामा केला. चोरीच्या प्रकारावरून चोरटे सराईत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Back to top button