लोणावळा : 28 जणांचा चावा घेतलेले माकड जेरबंद | पुढारी

लोणावळा : 28 जणांचा चावा घेतलेले माकड जेरबंद

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : मागील दीड ते दोन महिन्यांत तब्बल 28 जणांना चावत जखमी करणारे एक माकड पकडण्यात वनविभाग व शिवदुर्ग मित्रच्या टिमला यश आले आहे. त्यामुळे खंडाळा भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

खंडाळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून या माकडाने हौदोस घातला होता. गिरीजा हॉटेल, आयसीआयसीआय लर्निंग होम, दगडी बंगला या परिसरात सुरक्षा रक्षक तसेच गेस्ट व दुचाकीवर येणार्‍या लोकांना पाडून ते माकड चावत होते. साधारणपणे 27-28 जणांना ते चावल्याची शक्यता खंडाळा भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने ११ लाख ८० हजारांचे अमलीपदार्थ पकडले

मागील पंधरवड्यात तसेच त्यापुर्वी दिवसाआड वन विभागाने व शिवदुर्ग टिमने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते काही खासगी बंगल्यांमध्ये जात असल्याने हाती लागले नव्हते.

मात्र, नागरिकांमध्ये त्याची निर्माण झालेली दहशत व होत असलेले आक्रमण यामुळे त्याला पकडणे गरजेचे झाले होते. वनखात्याने विनंती केल्यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा, रेस्कु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व वनखात्याने संयुक्तपणे मोहीम राबवत माकडाला जेरबंद केले.

सूड भावनेतून ही करवाई : प्रविण दरेकर

माकड जेरबंद झाल्याने खंडाळामधील नागरिकांनी सुटकेचा निश्वासस टाकला आहे. वडगाव मावळ वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खंडाळा वन विभागाचे वनपाल सागर चुटके आणि रेस्कु चॅरिटेबल ट्रस्टचे तुहिन सातारकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Back to top button