पुणे : निर्बंध झुगारून लक्ष्मी रोडवर दुकाने सुरू, दुकानदार, पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक - पुढारी

पुणे : निर्बंध झुगारून लक्ष्मी रोडवर दुकाने सुरू, दुकानदार, पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, बुधवारी लक्ष्मी रोडवर रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी शासनाचे निर्बंध झुगारून दुपारी चार नंतरही दुकाने सुरू ठेवली. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना कारवाई करावी लागली. यावेळी अनेक दुकानदारांवर गुन्हे देखील दाखल झाले. यावेळी दुकानदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या.

अतिक्रमण कारवाईमुळे विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अचानक करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे महात्मा ज्योतिबा फुले शेतीमाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि विक्रेते राजाभाऊ कासुर्डे यांनी सायंकाळी चारच्या सुमारास पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे विक्रेत्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे मंडई परिसरातील परिसरातील विक्रेत्यांनी टिळक चौकात जमून विरोध करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अध्यक्ष कासुर्डे यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी तातडीने येत राजाभाऊ कासुर्डी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना अधिक चौकशी जातील पोलीस चौकीत नेले.

हे ही वाचलं का?

Back to top button