पुणे : पहिले लग्न झाल्याचे लपवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार - पुढारी

पुणे : पहिले लग्न झाल्याचे लपवून डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डॉक्टरचा नर्सवर बलात्कार : पहिला विवाह झाला असताना देखील नर्स असलेल्या तरूणीवर डॉक्टरने बलात्कार केला आहे. नर्स तरुणीला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा झाल्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देऊ बलात्कार डॉक्टरने केला. तसेच व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या डॉक्टरवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. शशिकांत शामराव सोरटे (39, रा. शिवाजीनगर, गणेशखिंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याड डॉक्टरचे नाव आहे. याबाबत एका 32 वर्षीय तरूणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॉक्टरचा नर्सवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणीही पुण्यातील रहिवासी ती नर्स म्हणून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. आरोपी हा डॉक्टर आहे. आरोपी डॉक्टरची आणि पीडित तरूणीची ओळख 2011 साली ती काम करत असलेल्या हॉस्पिटलमध्ये झाली.

नर्सिंग बरोबर ती केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करीत होती. याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने 2016 ते जानेवारी 2021 दरम्यान तिला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले.

तिला आपण तुझी युपीएससीची परिक्षा झाल्यावर लग्न करणार आहे, असे खोटे आश्वासन दिले. याच दरम्यान त्याने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले.

व्हिडीओ क्लिपची भिती दाखवून धमकी

तिने त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण देखील केली. तसेच त्याच्याकडे असलेल्या व्हिडीओ क्लिपची भिती दाखवत होता.

ब्लॅकमेल करून शशिकांतने तिला आपले यापूर्वीच लग्न झाल्याचे सांगितले. तसेच त्याला पहिल्या लग्नापासून मुल असल्याचे सांगितले.

तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करताना त्याने तिला पूर्वी लग्न झाल्याची कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवले.

दरम्यान, तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन शशिकांत विरोधात बलात्कार, विनयभंग, मारहाण तसेच धमकाविल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. जमदाडे करीत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button