पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याने विनयभंग | पुढारी

पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याने विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एकाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी हिंजवडी परिसरात घडली.

हिंदुस्थानला गांधी बाधा झालेली आहे; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

विनोद सुदाम जाधव (रा. सूस, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय राऊत बंटी बबली, ४२० म्हणतात, नवनीत राणांची जेलमधून डायरेक्ट दिल्ली पोलीसांत तक्रार !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सकाळी साडेआठ वाजता घरी असताना आरोपी त्यांच्या घरी आला. ‘तू सारखीच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देत आहेस.

खिलाडूवृत्तीला सुरुंग!, हर्षलने परागशी हात मिळवण्यास दिला नकार

बघू तुला कोण वाचावतोय ते’ अशी धमकी देत आरोपीने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button