‘त्या’ बाजार समित्यांवर लवकरच प्रशासक नेमणार | पुढारी

‘त्या’ बाजार समित्यांवर लवकरच प्रशासक नेमणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्ष संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत पुढील 6 महिने यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांनी करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

देशात कोरोना पुन्हा वाढू लागला! २४ तासांत २,३८० नवे रुग्ण, ५६ मृत्यू

ज्या बाजार समित्यांचा 1 वर्षांपर्यंतचा मुदतवाढीचा वाढीव कालावधी पूर्ण झालेला नाही, अशा बाजार समित्या वगळून प्रशासक नियुक्त करावे, असेही आदेशात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सद्य:स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची कार्यरत संचालक मंडळांना 22 एप्रिल 2022 च्या पुढे मुदतवाढ देणे उचित होणार नाही, अशी शासनाची खात्री झाली आहे. त्याअन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील कलम 15 (अ) मधील कलम 59 मधील तरतुदीअन्वये प्राप्त अधिकारानुसार शासनाने आदेश जारी केले आहेत.

काॅंग्रेस नेते जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी केली अटक

संबंधित जिल्हा उपनिबंधकांनी याबाबतची कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करून पुढे म्हटले आहे की, सहा महिन्यांच्या कालावधीत संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत आणि प्रत्यक्ष संचालक मंडळ कार्यरत करण्यासाठी संबंधित प्रशासक आणि जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना आवश्यक सहकार्य करावे. या कालावधीत प्रशासकांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तथापि, काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा झाल्यास शासनाची पूर्वमान्यता घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित प्रशासक यांनीपरिपूर्ण प्रस्ताव स्वयंस्पष्ट अभिप्रायासह पणन संचालकांमार्फत शासनास सादर करावा, असेही शासनाचे सह सचिव (पणन) डॉ. सुग्रीव धपाटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

१२ तासांच्‍या आतच ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती; कोण आहेत हे अधिकारी?

किमान शंभर बाजार समित्यांवर प्रशासक

दरम्यान, राज्यात 281 बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त असून, त्यातील किमान 100 बाजार समित्यांवरील संचालक मंडळे बरखास्त होऊन प्रशासक नियुक्ती होणे अपेक्षित असल्याचे पणन संचालनालयातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्याबाबतची माहिती संकलित केली जात आहे.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे वधू-वराची मिरवणूक चक्क बैलगाडीतून ; कुठे ? बघाच

जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांवर येणार प्रशासक

शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांवर तत्काळ प्रशासकाची नियुक्ती अपेक्षित आहे. त्यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, निरा आणि भोर या पाच बाजार समित्यांवरील संचालक मंडळे बरखास्त होऊन प्रशासकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांनी दिली.

Back to top button